
पुणे : रिंगरोडच्या भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी १ हजार २२० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सोमवारी दिले. अतिरिक्त भूसंपादनाची गरज असल्यास त्यास तातडीने मान्यता द्यावी, असेही ते म्हणाले.