
पुणे : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत पुणे जिल्ह्यात एक हजार ८३ मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे काम सुरू असून त्यासाठी सात कंपन्या (एजन्सी) काम करत आहेत. या कंपन्यांनी आपल्या कामांचा वेग वाढवून प्रकल्प वेळेत कार्यान्वित करावेत, अन्यथा त्यांना पुढील पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी दिला आहे.