
पुणे : ‘‘स्वच्छ, सुंदर व प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतींनी महत्त्वाची भूमिका निभवावी आणि शासनामार्फत लवकरच ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धा’ राबविली जाणार आहे. त्यामध्ये सहभागी व्हावे. चालू वर्षी तीस लाख घरकुलांना मंजुरी दिली आहे. घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत,’’ अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.