Serum Institute Fire - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा; वाचा काय म्हणाले

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी आज शुक्रवारी भेट देऊन आढावा घेतला.

पुणे - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी आज शुक्रवारी भेट देऊन आढावा घेतला. माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

Live Updates -
मुख्यमंत्री काय म्हणाले-
आगीच्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे
अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढण योग्य होणार नाही
कोविशिल्ड लसीचा प्लांट सुरक्षित आहे
अपगात की घातपात याची चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल

सीईओ आदर पूनावाला काय म्हणाले
कोविसिल्ड लस सुरक्षित आहे
बीसीजीच्या प्लांटमध्ये आग लागली
हजारो कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज
बीसीजीसह इतर ओषधांच्या साठ्याचं मोठं नुकसान
रोटाव्हायरस लसीचं नुकसान झालं
जो काही फटका बसला आहे त्याचा परिणाम पुढच्या कामावर झाला आहे
सध्याच्या कोणत्याही कामात अडथळा नाही. लसीकरण सुरळीत होईल.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackaray visit to serum institute pc