शहरातील नव्वद टक्‍के रिक्षा सीएनजीवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : पेट्रोल-डिझेलवरील रिक्षांचे रूपांतर सीएनजीमध्ये करण्याच्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत पुणे शहरातील जवळपास नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक रिक्षा सीएनजीवर धावत असल्याचा दावा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केला आहे. आता पीएमपीएमएलच्या शंभर टक्के बस सीएनजीवर करण्याचे उद्दिष्ट एमएनजीएलकडून ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर सीएनजी वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी सीएनजीचे पंप वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

एमएनजीएलचे संचालक (वाणिज्य) संतोष सोनटक्के आणि संचालक राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पुण्याचा समावेश झाल्याने केंद्र सरकारने नेमलेल्या भुरेलाल समितीने काही वर्षांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या रिक्षांचे सीएनजीत रूपांतर केले जावे, असे सुचवले होते. त्याची दखल घेऊन महापालिकेने देखील सीएनजी किट बसवून घेणाऱ्या रिक्षाचालकांना अनुदान योजना राबविली होती. त्यानंतर एमएनजीएलने देखील याला चालना मिळावी, यासाठी मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविली होती. अखेर मोहिमेला यश आले आहे. 

रिक्षा परमिट नव्याने खुले झाल्यानंतर शहरात नोंदणी व दाखल झालेल्या बहुतांश रिक्षा सीएनजीवरील आहेत. शहरामध्ये सध्या साठ हजार रिक्षा असून, त्यापैकी पंचावन्न हजार रिक्षा सीएनजीवरील आहेत. सीएनजीच्या पंपांमध्ये वाढ झाली असली, तरी अजूनही रिक्षाचालकांना पंपावर प्रतीक्षा करावी लागते. हा कालावधी कमी करण्याकरिता आणखी पंप वाढविण्याची गरज आहे, याकडे रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी लक्ष वेधले आहे. 

सीएनजीवरील वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन सीएनजी पंपांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या शहरात 55 स्टेशन असून ही संख्या 75 वर नेण्याचा प्रयत्न आहे. 
राजेश पांडे, संचालक, एमएनजीएल 
 
Web Title: CNG at 90 percent of the citys rickshaw