सीएनजी वापरणाऱ्यांना खुशखबर ! दरात झाली कपात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

वाहनांमध्ये सीएनजी वापरणाऱ्या वाहनचालकांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने खूषखबर दिली आहे. येत्या पाच ऑक्टोबरपासून सीएनजीच्या दरात कपात होणार आहे.

पुणे : वाहनांमध्ये सीएनजी वापरणाऱ्या वाहनचालकांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने खूषखबर दिली आहे. येत्या पाच ऑक्टोबरपासून सीएनजीच्या दरात कपात होणार आहे.

वाहनांसाठीचा सीएनजी दर सध्या 56 रुपये 95 पैसे प्रती किलो आहे.  हा दर आता 55 रुपये 50 पैसे होणार आहे. तर घरगुती वापराचा सीएनजी 30 रुपये 50 पैशांवरून 29 रुपये 20 पैसे प्रती युनिट असेल. 

पाच ऑक्टोबरपासून ही दरकपात पुण्यात लागू होईल, अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस निमग लिमिटेडच्या पुणे कार्यालयाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CNG price cut in pune