नारळ,सुपारी उत्पादकांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट,नुकसानीची दिली माहीती,

नारळ,सुपारी उत्पादकांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट,नुकसानीची दिली माहीती,
Published on

नारळ, सुपारी उत्पादकांनी घेतली
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट

नुकसानीची दिली माहिती; शासनाकडून मदतीची मागणी

ॲग्रोवन वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी ः वातावरणातील बदल आणि वन्यप्राण्यांमुळे धोक्यात आलेल्या नारळ, सुपारी बागांचे वास्तव नारळ, सुपारी बागायतदारांनी गोव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडले. बागायतदारांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

वातावरणातील बदल आणि वन्यप्राण्यांमुळे कोकणातील बागायती संकटात सापडल्या आहेत. यावर्षी सुपारी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून, ५० ते ६० टक्के फळगळ झाल्याचे बागायतदारांनी सांगितले. यासंदर्भात नारळ, सुपारी बागायतदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गोव्यात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अभिजित नाईक, सुरेश गावस, उदय भोसले, आर. के. सावंत, संदीप पेडणेकर, भैय्या देसाई, संदीप राणे, विजय कदम आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष देसाई यांनी सुपारी आणि नारळ बागायतदारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. जिल्ह्यातील सुपारी उत्पादक शेतकरी प्रतिकूल हवामान व सततच्या पावसामुळे होणाऱ्या प्रचंड फळगळतीमुळे, तर नारळ बागायतदार लाल तोंडाची माकडे आणि शेकरू यांच्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. सुपारीमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ सुरू आहे. त्यामुळे सुपारी पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने विशेष भरपाई मंजूर करावी. सध्या वन विभागाकडून प्रति नारळ अवघे ७ रुपये भरपाई दिली जाते, तर बाजारात नारळाचा दर ३५ ते ४० रुपये आहे. त्यामुळे ही भरपाई प्रति नारळ किमान ३० रुपये करावी, अशी मागणी करण्यात आली.

नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया सोपी करावी. भविष्यात वन्यप्राण्यांपासून माड बागांचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देसाई यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com