
मार्केट यार्ड : अनियमित हवामानामुळे नारळाच्या उत्पादनात तब्बल २५ टक्क्यांची घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजारातील किमतीवर झाला आहे. मागील सहा ते सात महिन्यांत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात २०-३० रुपयांना मिळणारा नारळ आता ४०-५० रुपयांना मिळत आहे.