

कोची, ता. २३ (पीटीआय) : केरळ उच्च न्यायालयात एका साध्या नारळाच्या झाडावरून दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायाधीशांनी मिस्कील टिपणी करत संबंधित याचिका फेटाळून लावली आहे. तसेच या झाडावरून भांडणाऱ्या दोघा शेजाऱ्यांना न्यायाधीश पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र चहा किंवा कॉफी पित हा वाद मिटवण्याची सूचना केली.
काय आहे वाद?
तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील कराकुलम गावातील दोघा शेजाऱ्यांच्या घरांच्या सीमेवर एक नारळाचे झाड होते. हे झाड ज्याच्या मालकीचे होते, त्याच्या शेजाऱ्याला अशी भीती वाटत आहे की, हे झाड त्याच्या घराच्या बाजूला झुकलेले असून, कधीतरी पडू शकते किंवा त्याचा नारळ पडून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे हे झाड हटविण्यात यावे अशी मागणी या शेजाऱ्याने केली आहे. मात्र या झाडामुळे कोणतेही नुकसान होणार नसून ते आपल्याच बाजूने झुकावे म्हणून त्याला लोखंडी तारा बांधल्या आहेत आणि नारळ शेजाऱ्यांच्या आवारात पडू नयेत म्हणून जाळीही लावण्यात आली असल्याचे त्या झाडाच्या मालकाचे म्हणणे आहे. मात्र, त्याने समाधान न झाल्याने याचिकाकर्त्याने पंचायत, महसूल अधिकारी, लोकायुक्त आणि अखेर उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली.
दरम्यान, तक्रारीनंतर अनेक स्तरांवर तपासणीदेखील करण्यात आली असून हे झाड धोकादायक नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
मात्र तरीही याचिकाकर्ता समाधानी नसल्याने आणि त्याने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी नाराजी व्यक्त केला. हा वाद क्षुल्लक भांडण असल्याचे म्हणत, जर नारळाच्या झाडाला हसता आले असते, तर त्यावरून भांडणाऱ्या शेजाऱ्यांकडे पाहून ते हसले असते, अशी टिपणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.