पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू 

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू 

पुण : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील प्रत्येकी एक जागेसाठी येत्या एक डिसेंबर रोजी आठ ते सायंकाळी पाच वाजपेर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक खबरदारी घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. 
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पदवीधर मतदारसंघातील चंद्रकांत पाटील आणि शिक्षक मतदारसंघातील दत्तात्रेय सामंत यांची 19 जुलै रोजी मुदत संपली आहे. या दोन जागा रिक्‍त झाल्या आहेत. या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सूचनेनुसार खबरदारी घेण्यात यावी. तसेच, अचूक, शास्त्रोक्त आणि समन्वयाने वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. बैठकीत जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेबाबत पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची बुधवारी बैठक होणार आहे. 

मतदान केंद्रांवर मास्क बंधनकारक 
मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक मतदान बूथवर हॅंड सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनर ठेवण्यात येणार आहेत. 

असा राहील निवडणूक कार्यक्रम : 
अधिसूचना जारी 5 नोव्हेंबर 2020 (गुरुवार) 
नामनिर्देशनपत्रे दाखल 12 नोव्हेंबरपर्यंत (गुरुवार) 
छाननी 13 नोव्हेंबर (शुक्रवार) 
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची 17 नोव्हेंबरपर्यंत (मंगळवार) 
मतदान 1 डिसेंबर (मंगळवार) 
मतमोजणी 3 डिसेंबर (गुरुवार) 

मतदार संख्या : 
पदवीधर मतदारसंघ : 5 लाख 35 हजार 
शिक्षक मतदारसंघ : 1 लाख 18 हजार 556 
मतदान केंद्र 1160 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com