
पुणे : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सरकारी रुग्णालयांत प्रसूती झालेल्या महिलेचे बाळ चोरी होऊ नये, चोरी झाल्यास ते तत्काळ सापडावे, यासाठी विभागाने ‘कोड पिंक’ मार्गदर्शक प्रणाली राज्यातील ३५ वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये लागू केली आहे. त्यामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयाचा समावेश असून, प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.