मलकापूर रोटरीच्या वतीने  शीतशवपेटीचे लोकार्पण

मलकापूर रोटरीच्या वतीने शीतशवपेटीचे लोकार्पण

Published on

‘मलकापूर रोटरी’तर्फे शीत शवपेटीचे लोकार्पण

मलकापूर, ता. २७ : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहाेचावी आणि व्यक्तीच्या निधनानंतरही त्याला सन्मानाने निरोप मिळावा, या हेतूने येथील रोटरी क्लबच्या वतीने कऱ्हाड येथील प्रेमसागर फाउंडेशनला शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, की त्याचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह ठेवावा लागतो. कुटुंबीय व नातेवाईक परराज्यात किंवा लांब पल्ल्याच्या ठिकाणी असतात. ते येईपर्यंत मृतदेहाची हेळसांड होते. त्यामुळे शीत शवपेटी गरजेचे व अत्यावश्यक असल्याचे क्लबच्या लक्षात आले. क्लबने शीतपेटी लोकार्पण करण्याचे ठरवले. नुकताच त्याचा लोकार्पण सोहळा झाला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा आमले, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, सह्याद्री मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार, प्रेमसागर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर बर्गे, रोटरीचे अध्यक्ष राहुल जामदार, सचिव विजय दुर्गावळे व रोटरीचे सदस्य उपस्थित होते. उमेश यादव यांनी शीत शवपेटी या उपक्रमाची माहिती दिली.

.......
चौकट
............

ग्रामीण व शहरी भागात आकस्मित मृत्यूप्रसंगी शव सुरक्षित ठेवण्यासाठी ही शीत शवपेटी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कुटुंबीयांना मानसिक दिलासा मिळेल. हा उपक्रम केवळ भौतिक साधन पुरवणारा नसून मृत्यूनंतरही माणसाला सन्मान देणाऱ्या माणुसकीच्या मूल्यांचा संदेश देणारा आहे.

- राहुल जामदार,
अध्यक्ष, रोटरी क्लब, मलकापूर
....

A01243
सातारा ः मलकापूर रोटरी क्लबच्या वतीने शीत शवपेटी लोकार्पणप्रसंगी श्रद्धा आमले, अनिल घराळ, रोहित पवार, सागर बर्गे, राहुल जामदार, विजय दुर्गावळे व रोटरीचे पदाधिकारी. (राजेंद्र ननावरे ः सकाळ छायाचित्रसेवा)
...........................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com