पुणे शहरात तापमान घसरल्याने हुडहुडी वाढली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

शहरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाढणारा किमान तापमानाचा पारा गुरुवारच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने कमी झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. अवघ्या चोवीस तासांमध्ये किमान तापमान घसरल्याने पुण्यात थंडी परतली आहे.

पुणे - शहरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाढणारा किमान तापमानाचा पारा गुरुवारच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने कमी झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. अवघ्या चोवीस तासांमध्ये किमान तापमान घसरल्याने पुण्यात थंडी परतली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूर्वेकडील बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्‍चिमेकडील कोरडे वारे मध्य महाराष्ट्रात एकत्र येत आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर आणि परिसरातही अंशत: ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. गुरुवारच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने तर, सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सिअसने तापमान अचानक कमी झाले. त्यामुळे पुणेकरांनी शुक्रवारी थंडी अनुभवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold in pune city by temperature decrease