

Pune Cold Wave
sakal
पुणे - गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. शहरातील काही भागांमध्ये किमान तापमान सहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत; तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.