पुणे - गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानामध्ये घट झाली होती. मात्र, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. .शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये चढ-उतार कायम आहेत. त्यामुळे किमान तापमानामध्ये कधी घट तर कधी वाढ होताना दिसत आहे.या वातावरण बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावरदेखील विपरीत परिणाम होत आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये शुक्रवारी (ता. २४) १४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. शहरातील कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे ऐन थंडीत दिवसभर उन्हाचा चटका जाणवत आहे..शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात सतत बदल होत असल्याने दिवसा उन्हाळा आणि रात्री गारवा असा अनुभव पुणेकर घेत आहेत. दररोज किमान तापमानात कमी-अधिक वाढ होत असून, गेल्या २४ तासांत पुन्हा किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे.दरम्यान, कमाल तापमानातही एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरामध्ये शुक्रवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. परिणामी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे..संपूर्ण राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमाल तापमानामध्ये एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे, तर पुढील चार ते पाच दिवस विदर्भामध्ये कमाल तापमानामध्ये फारसा फरक होणार नसल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे..पुणे आणि परिसरामध्ये शनिवारी (ता. २५) किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडेल, तर मंगळवारी (ता. २८) किमान तापमानामध्ये एक अंश सेल्सिअसने वाढ होणार असून, १५ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.