pune cold
sakal
पुणे - शहरातील किमान तापमानामध्ये गेल्या काही दिवसांत लक्षणीयरीत्या वाढ झाली होती. त्यामुळे थंडी ओसरली होती. मात्र गुरुवारी (ता. ८) किमान तापमानामध्ये मोठी घट नोंदविण्यात आली आहे. तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरात थंडी परतली आहे.