
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्ताची विशेष गरज लक्षात घेऊन समर्थ भारत व जनकल्याण रक्तपेढीच्या विद्यमाने शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित रक्तदान शिबिरास पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीड महिन्यात सुमारे 10 हजार 528 रक्तपिशव्यांचे संकलन झाले (Collection of ten and a half thousand blood bags in a month and a half in Pune)
शहरातही 1 मे पासून लसीकरणाला महत्त्व देण्यात आले. लसीकरणानंतर रक्ताचा तुटवटा निर्माण व्हायला नको, यासाठी समर्थ भारतच्या विद्यमाने पुणे महानगरात विविध ठिकाणी 1 एप्रिल ते 15 मे या दरम्यान विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे, शिक्षण संस्था यांच्यातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. एकशे दहा रक्तदान शिबिरे झाली. त्यासाठी एकूण १५ हजार ३४७ स्त्री-पुरुषांनी नोंद केली होती. या शिबिरात महिला आणि युवकांचा सहभाग लक्षणीय होता. कात्रज, आंबेगाव, पूर्व हवेली, हडपसर, वडगावशेरी, येरवडा, विद्यापीठ, औंध, बाणेर, बावधन, सिंहगड रोड, सहकारनगर, पर्वती, कोथरूड, कर्वेनगर, कसबा, कॅम्प परिसर, महादजी शिंदे, वानवडी, धनकवडी, बिबवेवाडी, धायरी, वडगाव, नारायण पेठ, प्रभात रोड, गोखले नगर, डेक्कन, सनसिटी, आयडीयल कॉलनी, वारजे, लोणीकाळभोर आदी भागांत रक्तदान शिबिरे झाले.
एकूण रक्तपिशवी संकलन - १०५२८
सहभागी रक्तपेढ्या – २०
सहभागी संस्था
सामाजिक - ९८
शिक्षण - १०
विविध राजकीय पक्ष - ३
शहरातील रक्तसाठा सुमारे तिप्पट वाढला.
पुणे शहरातून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत भंडारा, जालना, मुंबई व इतर ठिकाणी रक्तपुरवठा
''लसीकरणा दरम्यान येणारी रक्त तुटवडा अडचण लक्षात घेऊन रक्तपेढींच्या आवाहनानुसार समर्थ भारतच्यावतीने समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी व्यापक स्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध गणेश मंडळे, ज्ञाती संस्था, शिक्षण संस्था सहभागी झाले होते. पुणे महानगरात एकूण शंभर रक्तदान शिबिरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात 110 शिबिरे पार पडली.''
- महेश मानेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.