Breaking : पुण्यात पीएमपीची वाहतूक सुरू करण्याबाबत महत्वाचा आदेश...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहर, जिल्हा आणि पिंपरीमध्ये लॉकडाउन असला तरी, देशातील 200 मार्गांसाठी रेल्वे आणि पुण्यातून 8 शहरांसाठी विमान वाहतूक सध्या सुरू आहे. विमानांची दररोज सुमारे 25- 30 उड्डाणे होत आहेत तर, रेल्वेच्याही 13 फेऱया होत आहेत. दोन्ही ठिकाणावरून दररोज सुमारे 10 हजार प्रवाशांची ये-जा सुरू आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणांहून बस सुरू करण्याबाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांना विचारणा केली असता, पुणे स्टेशन आणि विमानतळावरून बससेवा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. तसेच दोन्ही यंत्रणांनी बससेवा सुरू करा, असे पत्रही पीएमपीला दिले आहे.

पुणे : लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱया प्रवाशांसाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. येत्या दोन किंवा तीन दिवसांत या बस सुरू होतील. जिल्हाधिकाऱयांनी या बाबतचा आदेश दिल्यावर बससेवा सुरू करण्याचे पीएमपीने ठरविले आहे. 

विमानतळावर येणाऱया आणि जाणाऱया विमानांचे आणि रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन त्यानुसार बसचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी दोन्ही ठिकाणच्या संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. ही बससेवा अहोरात्र सुरू असेल. विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी प्रती प्रवासी 70 रुपये तिकिट असेल. तसेच रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी दिवसा आणि रात्री वेगवेगळे तिकिट दर असतील, असेही त्यांनी सांगितले. बससेवेचे सध्या नियोजन करण्यात येत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहर, जिल्हा आणि पिंपरीमध्ये लॉकडाउन असला तरी, देशातील 200 मार्गांसाठी रेल्वे आणि पुण्यातून 8 शहरांसाठी विमान वाहतूक सध्या सुरू आहे. विमानांची दररोज सुमारे 25- 30 उड्डाणे होत आहेत तर, रेल्वेच्याही 13 फेऱया होत आहेत. दोन्ही ठिकाणावरून दररोज सुमारे 10 हजार प्रवाशांची ये-जा सुरू आहे. 

जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. तसेच दोन्ही यंत्रणांनी बससेवा सुरू करा, असे पत्रही पीएमपीला दिले आहे. त्यानुसार नियोजन करण्याची कार्यवाही करण्यास सुरवात केली आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९८.०५ टक्के 

पुणे रेल्वे स्टेशन आणि विमानतळावरून जा- ये करण्यासाठी प्रवाशांना रिक्षा आणि कॅबचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. तसेच खासगी वाहनांतूनही प्रवासी ये-जा करू शकतात. मात्र, ज्या प्रवाशांना रिक्षा आणि कॅबचे भाडे परवडत  नाही, त्यांची अडचण होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच रिक्षा प्रवासासाठी भाडे सध्या दुप्पट द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीच्या 125 बस सध्या अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहेत. रिक्षा आणि कॅबमध्ये ज्या प्रमाणे रेल्वे- विमानाचे तिकिट दाखवून प्रवास करता येतो, तसेच पीएमपीच्या बसमधूनही प्रवास करणे शक्य होईल, असे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. 
 
- दरम्यान लोहगाव विमानतळावर मंगळवारी एकूण 35 विमानांची उड्डाणे झाली. त्यातून 942 प्रवासी पुण्यात आले तर, 1476 प्रवासी पुण्यातून बाहेर पडले. लॉकडाउनमुळे पुण्यात येणाऱया प्रवाशांच्या संख्येत  35 टक्के तर, बाहेर पडणाऱया प्रवाशांच्या संख्येत 45 टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली.  

- रेल्वेच्याही 12 फेऱया बुधवारी झाल्या. त्यातून सुमारे चार ते पाच हजार प्रवाशांची ये-जा झाली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. रेल्वेच्या वाहतुकीवर लॉकडाउनचा फारसा परिणाम झालेला नाही. वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector orders to Start PMP bus service from railway station, airport