
पुणे : ‘तुमच्यावर कारवाई करण्याची इच्छा नाही, पण वेळेत काम झाले पाहिजे,’ हे सांगितले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंडल अधिकाऱ्यांना. जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कामकाजाचे धडे दिले.