लोहगाव - येथील डी.वाय. पाटील रस्त्यावर डंपरला धडक बसल्याने २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. स्वप्निल प्रकाश साळवे (वय-२२) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत स्वप्निल हा डुडूळगाव येथील कॉलेज संपवून डी. वाय. पाटील रस्त्याने केसनंदकडे दुचाकी (एम.एच.१४, एम.डी ६३५७) ने जात होता. त्यावेळी समोरून येणारा डंपर (एम.एच. १२ आर.एम ४५५८) या वाहनास धडक बसल्याने तो मागील चाकाखाली येऊन मृत्यूमुखी पडला.
माहितीनुसार स्वप्निल हा यवत ता.दौंड येथील रहिवाशी असून तो डुडूळगाव येथे बी.फार्म चे शिक्षण घेत होता. केसनंद येथे मित्रांसोबत राहत होता. शिक्षण घेत तो मेडीकलमध्ये कामही करत होता. स्वप्निलच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असल्याचे समजते.
याप्रकरणी डंपरचालक व्यंकट गुरप्पा पवार (रा. निरगुडी रस्ता, लोहगाव) याला ताब्यात घेतले असून विमानतळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण अधिक आहे. याबाबत पालिका प्रशासनाला अनेकदा तक्रार करुनही काहीही उपयोग होत नाही. 'लवकरचं रस्ता करु.' असे सांगून अधिकारी तक्रार निकाली काढतात.
- शंकर किरडे, नागरीक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.