Rakesh Naik
sakal
नारायणगाव - येथील पुणे-नाशिक महामार्गावर बाह्यवळण रस्त्यावर पुणे बाजू कडून नाशिक बाजूकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसून राकेश उर्फ अक्षय अंबेश नाईक (वय-24, राहणार नारायणगाव, साकार नगरी) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.