
वालचंदनगर - भवानीनगर (ता.इंदापूर) येथे मुलीच्या प्रेमसंबधावरुन दोन विद्यार्थ्य्यांच्यावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पाच विद्यार्थ्य्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. कोयत्याने मारामारीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.