colonel sadanand salunke
sakal
केडगाव - भारत-पाकच्या १९७१ मधील युद्धात भारतावर हल्ला करण्यासाठी दारूगोळा, हत्याराने भरलेली रेल्वे लाहोरकडे जाणार होती. युद्ध सुरू असताना पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन ही मालगाडी मध्येच अडविण्याची जबाबदारी एका उमद्या मराठी सैन्य अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. या अधिकाऱ्याने जिवाची बाजी लावत मोहीम फत्ते केली. रेल्वेचा अपघात घडविण्यात आला. पाकिस्तानी लष्करात हाहाकार माजला. रसद थांबली अन् युद्धही थांबले.