
पुणे : हवामान बदल तसेच कार्बन उत्सर्जनाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राज्य हवामान कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास राज्याच्या ‘राज्य हवामान कृती कक्षा’चे संचालक डॉ. अभिजित घोरपडे यांनी व्यक्त केला.