पुणे कोथरूड दादा परत या" कोथरूडमध्ये झळकले फलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant patil

पुणे : कोथरूड दादा परत या" कोथरूडमध्ये झळकले फलक

कोथरूड : "दादा परत या ! दादा एक महिना झाला तुमचा शोध लागत नाहीये. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय. समस्त कोथरूडकर असे लिहिलेले फलक कोथरूड मतदारसंघात झळकले आहेत.कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील सध्या कोल्हापूर मधील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. नेमकी ही संधी साधून भाजपला चीमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

कोथरूड मधून दादा निवडणूक लढवणार हे जाहीर झाल्यानंतर स्थानिक विरूद्ध कोल्हापूरकर अशी निवडणूक होईल असा प्रयत्न करण्यात आला होता. पण चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकरांनी भरघोस मतांनी निवडून दिले. कोथरूडचे आमदार असलेले चंद्रकांत दादा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यातच कोल्हापूर मधील प्रतिष्ठेचो बनल्याने चंद्रकांत पाटील तेथे व्यस्त आहेत. दादांचे कार्यालय असलेल्या महर्षी कर्वे स्मारका जवळील बसथांबा, गांधीभवन आदी भागात पोस्टर लावण्यात आले.

भाजपाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर म्हणाले की, खरे तर अश्यांना अनुल्लेखेना मारणेच योग्य. यावर प्रतिक्रिया द्यावी असे काही नाही.दादा कोल्हापूर च्या प्रचारात व्यस्त आहेत. पण पुण्यात रोजच संपर्कात असून दैनंदिन विषय मार्गी लावणे सुरु आहे. काही नटद्रष्ट मंडळींनी फ्लेक्स लावले असून स्वतः चे नाव ना टाकताअसे फ्लेक्स लावणारे भेकड आहेत.कोणताही राज्य स्तरावरचा नेता काही मतदारसंघात बसून नसतो. अजितदादा पालकमंत्री आहेत, ते आठवड्यातून एकदाच पुण्यात येतात.चंद्रकांतदादा कोथरूड चे आमदार आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांचा राज्यभर प्रवास असतो .. नाना पटोले किंवा जयंत पाटील साहेब काय त्यांच्या गावात बसून असतात काय ? केवळ पोटदुखीतून अशी निरर्थक टीका केली जाते.

Web Title: Come Back To Pune Kothrud Chandrakant Dada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..