उंब्रज महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत कार्यशाळा संपन्न
‘वाणिज्य’मुळे आर्थिक, व्यवस्थापन ज्ञान
डॉ. अवघडे; उंब्रजला जगताप महाविद्यालयात व्याख्यान
उंब्रज, ता. १२ : वाणिज्य विभागातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक, व्यापारी व व्यवस्थापनविषयक ज्ञान मिळते. हे ज्ञान नोकरीसह स्वतःच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. डॉ. विनोद अवघडे यांनी केले.
येथील सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत वाणिज्य विभागाने स्पर्धात्मक जगात वाणिज्य शिक्षणाची भूमिका या विषयांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बाेलत हाेते. प्राचार्य डॉ. संभाजी गावडे अध्यक्षस्थानी हाेते. उपप्राचार्य प्रा. मनोहर माळगे, प्रा. मारुती तांबे, प्रा. गिरी उपस्थित हाेते.
प्रा. डाॅ. अवघडे म्हणाले, ‘‘विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. व्यवस्थापन क्षेत्रातही व्यवस्थापन पदवी केल्यानंतर कंपनीतील प्रशासकीय पदे संगणक व डिजिटल क्षेत्रात, तसेच स्पर्धा परीक्षा दिल्यावर या क्षेत्रातही करिअर करू शकतात. यामुळे आर्थिक व्यवहारांची समज वाढते, नोकरी व व्यवसाय दोन्हीत संधी उपलब्ध होतात.’’
प्राचार्य डाॅ. गावडे म्हणाले, ‘‘योग्य नियोजन व मेहनत केल्यास या क्षेत्रातून उज्ज्वल भविष्य घडवता येते. वाणिज्य विभाग म्हणजे, आर्थिक स्वावलंबनाचा मजबूत पाया आहे. याचा विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी उपयोग करावा.’’
प्रा. मारुती तांबे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. प्रा. पल्लवी देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. माधुरी साळुंखे यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
B00775
उंब्रज ः कार्यक्रमात बाेलताना प्रा. डॉ. विनोद अवघडे. त्या वेळी मान्यवर.
........................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

