पुणे - शहरात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिनी आणि जलवाहिनी शेजारून गेली आहे. गळती होत असलेल्या जलवाहिनीत सांडपाणी मिश्रित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा ठिकाणी त्वरित दुरुस्ती करून सांडपाणी वाहिनी आणि जलवाहिनी स्वतंत्र करा, त्यात अंतर ठेवा असे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत.