काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

शहर पोलिस दलाचे कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी "तुम्ही योग्य उपचार घेऊन स्वत-ची काळजी घ्या. तुम्ही लवकरच बरे व्हाल' अशी आशा व्यक्त करत त्यांनी पोलिसांचे मनोबलही वाढविले.

पुणे - कायदा व सुव्यवस्था राखत जीवाचे रान करतानाच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांशी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ऑनलाइन संवाद साधत आपुलकीने चौकशी केली. शहर पोलिस दलाचे कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी "तुम्ही योग्य उपचार घेऊन स्वत-ची काळजी घ्या. तुम्ही लवकरच बरे व्हाल' अशी आशा व्यक्त करत त्यांनी पोलिसांचे मनोबलही वाढविले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्यांनी शहर पोलिस दलातील कोरोनाबाधितांशी संवाद साधला. तसेच होम क्वारंटाइन आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांशी ऑनलाइनच्या माध्यमातून विचारपूस केली. "तुम्हाला कोरोना केव्हा झाला?', "तुमच्यावर उपचार व्यवस्थित सुरू आहेत का? अशी आपुलकीने विचारपूस केली. "तुम्ही कोरोनावर मात करून लवकर बरे व्हाल' अशा शुभेच्छा देत पोलिसांचे मनोबल वाढविले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझी बहीण डॉक्‍टर आहे. ती कोरोनाबाधितांची सेवा करता असतानाच तिच्यासह तिच्या दोन मुलांनाही संसर्ग झाल्याची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. पोलिसांनी सेवेबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या स्वास्थ्याला प्राधान्य द्यावे, असा आत्मियतेने सल्लाही गुप्ता यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Commissioner of Police interacted with the coronated police