पुणे जिल्ह्यातील १५० हरकती व सूचनांवर आयुक्त निर्णय करणार जाहीर

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गणांबाबत दाखल झालेल्या १५० हरकती व सूचनांमधील तथ्य जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी सुनावणी घेतली.
saurabh-rao
saurabh-raosakal
Summary

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गणांबाबत दाखल झालेल्या १५० हरकती व सूचनांमधील तथ्य जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी सुनावणी घेतली.

पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रारूप गट व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गणांबाबत दाखल झालेल्या सर्वच्या सर्व १५० हरकती व सूचनांमधील तथ्य जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी (ता.१६) सुनावणी घेतली. या सुनावणीत राव यांनी प्रत्येक हरकत व सूचनेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतली. यावर विभागीय आयुक्त राव हे येत्या २२ जूनपर्यंत निर्णय जाहीर करणार आहेत.

या सुनावणीत जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रारूप रचनेत कसे बदल गेले आहेत. हे बदल नियमाला धरून नाहीत. त्यामुळे त्यात बदल करावेत, अशी मागणी हरकती व सूचना दाखल करणाऱ्यांकडून करण्यात आली. याउलट गट व गणांचे प्रारूप आराखडे योग्य असल्याचे हरकत घेणाऱ्यांच्या विरोधातील गटांकडून सांगण्यात आले. नवी रचना करताना भौगोलिक सलगता, हद्दी आणि काही ठिकाणी लोकसंख्येचेसुद्धा उल्लंघन झाल्याचे काही हरकतदारांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

जुन्नर तालुक्यातील गट व गणांच्या प्रारूपामध्ये काही ठराविक गावांचा समावेश विशिष्ट गटांमध्ये केल्याचे हरकदारांकडून यावेळी सांगण्यात आले. इंदापूर तालुक्यातील गट आणि गणांच्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. जिल्ह्यातील गट आणि गणांबाबत सर्वाधिक हरकती या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आल्याचे या सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. भाजपच्यावतीने घेण्यात आलेल्या हरकतींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हरकत घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने गट आणि आणि गणांची केलेली प्रारूप रचना योग्य व बरोबर असल्याचा युक्तिवाद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला.

येत्या २७ जूनला अंतिम गट जाहीर होणार

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या बाबतीत निश्‍चित करून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार या हरकती व सूचनांवर येत्या २२ जूनपर्यंत निर्णय घेण्याचे बंधन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यावर आहे. त्यानंतर राव हे गट आणि गणांची रचनेबाबतच्या हरकतींवर घेतलेल्या निर्णयाबबतचे सर्व आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठवतील. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख हे येत्या २७ जून रोजी गट व गणांची अंतिम रचना प्रसिद्ध करतील, असे गुरुवारी (ता.१६) विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com