मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष; मतमोजणीच्या अपडेटसाठी १९५० टोल फ्री क्रमांक

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
communication room at polling station 1950 toll free number for vote counting updates
communication room at polling station 1950 toll free number for vote counting updatesSakal

Pune News : जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होत असून नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. दरम्यान सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी केली जाणार आहे.

एका लोकसभा मतदारसंघात फक्त ३० व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी करून ती ईव्हीएममधील मतांशी पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने फक्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी करण्यासाठी मतदान केंद्राची निवडही चिठ्ठी टाकून होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी हे चिठ्ठी काढून मतदान केंद्र निवडणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com