मुख्यमंत्री समृद्ध अभियाना अंतर्गत श्रमदाणातून लवंगीत बांधला वनराई बंधारा : लोकसहभागातून गावांचा शास्वत विकास करणे हा या अभियानाचा उद्देश

मुख्यमंत्री समृद्ध अभियाना अंतर्गत श्रमदाणातून लवंगीत बांधला वनराई बंधारा : लोकसहभागातून गावांचा शास्वत विकास करणे हा या अभियानाचा उद्देश

Published on

SLR25B00736
सलगर बु. ः गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधलेला वनराई बंधारा.

लवंगीच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
लोकसहभागातून गावांचा शास्वत विकास करणे हा या अभियानाचा उद्देश

सलगर बुद्रूक, ता. ३१ : मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण टोकाला दुष्काळी पट्यात असणाऱ्या लवंगी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ग्रामस्थ व कर्मचारी वर्गाच्या श्रमदाणातून ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. या बांधऱ्याच्या लोकार्पणप्रसंगी तालुक्यातील पंचायत समिती विभागातील अधिकारी उपस्थित होते. अभियानात लवंगी ग्रामपंचायतने सहभाग घेतला.

याप्रसंगी गटविकास अधिकारी जस्मिन शेख, विस्तार अधिकारी हरिदास नरळे व अशोक नलावडे
कृषी अधिकारी आर. पी. कांबळे, विस्तार अधिकारी राहुल मिसाळ व मधुकिरण डोरले,
शिक्षण विभागाचे दत्तात्रय येडवे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तसेच पाणी पुरवठा विभाग, अंगणवाडी विभाग, आरोग्य विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित होते.
या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच पूनम हुवाळे व ग्रामसेवक राहुल कांबळे, सदस्य मायापा पांढरे, धनाजी खडतरे यांच्या बरोबरच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्य शासनाचा एक उपक्रम आहे. जो ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना सक्षम बनवून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि लोकसहभागातून गावांचा शाश्वत विकास साधणे हा या अभियानाचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाने सदर अभियान २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून सुरू केले आहे. ज्यामध्ये सुशासन, पाणी, स्वच्छता, रोजगार आणि सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com