अध्यक्षपदी प्रवीण भवार;
महासचिवपदी प्रतीक देसाई

अध्यक्षपदी प्रवीण भवार; महासचिवपदी प्रतीक देसाई

Published on

वडगाव मावळ, ता. ६ : जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६’ची नियोजन समिती जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी प्रवीण भवार यांची तर महासचिवपदी प्रतीक देसाई यांची निवड करण्यात आली.
जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २०१९ पासून दरवर्षी सामुदायिक मंगल परिणय सोहळा घेण्यात येतो. राज्यात सामुदायिक बौद्ध सोहळे आयोजित करणारे हे एकमेव ट्रस्ट म्हणून ओळखले जाते. या वर्षी हा सोहळा १२ मे रोजी होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार, सचिव सचिन कांबळे, विश्वस्त प्रभाकर वाघमारे, संजय गायकवाड, आनंद वंजारी, अनिल गायकवाड, नीलेश शिंदे, दलितानंद थोरात, ज्योती शिंदे, संदीप ओव्हाळ, सचिन भवार, दादासाहेब यादव आदी उपस्थित होते.
नियोजन समिती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- प्रवीण भवार, कार्यक्रम प्रमुख- प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष - प्रवीण साळवे, महासचिव- प्रतीक देसाई, सहसचिव- प्रवीण सरोदे, कार्याध्यक्ष- रवी भवार, सहकार्याध्यक्ष- संदीप जाधव, कोषाध्यक्ष- नीलेश गायकवाड, सहकोषाध्यक्ष- मनिषा ओव्हाळ, संपर्क प्रमुख- भाऊ साबळे, राहुल जाधव, याशिवाय विभागीय अध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, संघटक आदींची नियुक्ती करण्यात आली.

समितीकडून आवाहन
विवाह इच्छुक उपासक-उपासिका यांनी या नियोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक समस्येपासून दूर ठेवण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार यांनी केले आहे. प्रास्ताविक सचिन कांबळे यांनी केले. विश्वस्त प्रभाकर वाघमारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com