वडगावात रविवारी सामुदायिक मंगल परिणय सोहळा

वडगावात रविवारी सामुदायिक मंगल परिणय सोहळा
Published on

वडगाव मावळ, ता. १५ : मावळ तालुक्यातील जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवारी (ता. १७) वडगाव मावळ येथे सामुदायिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.
ट्रस्टच्या सामुदायिक परिणय सोहळा उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अजय भवार, महासचिव सचिन कांबळे, सामुदायिक मंगल परिणय सोहळा समिती-२०२६ चे अध्यक्ष प्रवीण भवार, कार्यक्रम प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यावर्षीच्या सोहळ्याची माहिती दिली. या वर्षी वडगाव येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी सात वाजता हा सोहळा होणार आहे. तत्पूर्वी दुपारी तीन वाजता तळेगाव दाभाडे येथील विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात आदर्शांना अभिवादन करून नवरदेवांची वडगाव येथील ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर ते भेगडे लॉन्स अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंगल परिणय सोहळा होईल. विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना विधी पोशाख, संसारोपयोगी वस्तू, पैंजण-जोडवी, मनगटी घड्याळ तसेच वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com