
मंचर : भोरवाडी-अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे सहकारमहर्षी माजी आमदार (स्व) दत्तात्रय वळसे पाटील यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (ता.११) शिवसम्राट युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने संपन्न झालेल्या शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या सोहळ्यात सहा वधू-वरांचे विवाह समारंभ पार पडले. दीड हजाराहून अधिक वऱ्हाडी मंडळींनी व वधू-वरांनी बालविवाह होऊ न देण्याची सामूहिक शपथ घेतली. अक्षदा ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.