लायन्स क्लबतर्फे सामुदायिक विवाह सोहळा
लोणावळा, ता. ३ : लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत व वंचित घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आदिवासी समाजातील तीन जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात उत्साहात पार पडला. ओळकाईवाडी येथील ओळकेश्वर मंदिर परिसरात झालेल्या या सोहळ्यास लायन्सचे प्रांतपाल राजेश अगरवाल, उमेश अगरवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमासाठी अध्यक्षा साधना टाटिया यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी सारिका अगरवाल व खजिनदार सुमित भडेशिया, डॉ. सीमा शिंदे यांच्यासह विजय मानकर, नवीन भुरट, गिरीश पारख, स्वरूप सूद, आनंद खंडेलवाल यांचे सहकार्य मिळाले.
‘‘नवदांपत्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश आहे,’’ अशी भावना यावेळी प्रांतपाल राजेश अगरवाल यांनी व्यक्त केली. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

