

मुळशी-मावळ सीमेवर मृत्यूचा सापळा! जवण घाटातील 'ती' विहीर ठरतेय धोकादायक; नाशिकच्या दुर्घटनेनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त
Sakal
पांडुरंग साठे
कोळवण : कोळवण परिसरातील कोळवण काशिग रस्त्यावर मुळशी तालुका व मावळ तालुका या दोन तालुक्यांच्या हद्दीवर जवणच्या घाट उतारावर एक धोकादायक विहीर असून दोन तालुक्यांना जोडणा-या मध्यवर्ती सीमेवर हि विहीर असून वाहनचालकांसाठी वाहने चालवताना विहिरीस योग्य सुरक्षा उपाय नसल्याने धोकादायक आहे.