
कडूस : 'कामावर या नाहीतर नोकरीवरून काढून टाकू,' अशी धमकी कंपनी प्रशासन देत आहे, तर 'कंटेन्मेंट झोनच्या बाहेर अजिबात पडायचे नाही,' अशी सक्त ताकीद गावकरी देत आहे. एका बाजूला रोजीरोटीसाठी जीवावर उदार होऊन घराबाहेर पडावे लागत आहे; तर दुसऱ्या बाजूला बाहेर पडल्यावर कोरोनाच्या धोक्यासह गावकऱ्यांचा व आजूबाजूच्या रहिवाश्यांचा रोष पत्करावा लागत आहे. 'आम्ही करायचे तरी काय?' असा सवाल औद्योगिक क्षेत्रातील कामगार करीत आहे.
जिल्ह्यात लॉकडाऊन असला तरी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना मात्र यातून सूट दिली आहे. यामुळे कंपन्या सुरू आहेत. परंतु कोरोनाच्या महामारीत या कंपन्यांमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांची सध्या मोठी परवड सुरू आहे. जीवावर उदार होऊन कामाला जाताना चाकरमान्यांना जगण्यासाठी दररोज मरण्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. कामावर येण्यासाठी कंपनी प्रशासन कामगारांना सक्ती करीत आहे. कामगारांना रजा देत नाही. हक्काची रजा नाकारली जात आहे. गैरहजर राहिले तर नोकरीवरून काढून टाकू, अशी सतत धमकी दिली जात आहे. कामावर येण्यासाठी कामगारांवर दबाव आणला जातोय. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधित गावांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी कंटेन्मेंट झोनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी गावकरी, ग्रामपंचायत, रहिवासी सोसायट्या प्रयत्न करीत आहे. या ठिकाणाहून कोणालाच घराबाहेर पडू दिले जात नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कामगारांना सुद्धा घराबाहेर पडण्यास विरोध केला जात आहे. अशा परिस्थितीत कामगार कंपनीत कामावर जाणार तरी कसे? पण अशाही परिस्थितीत कामगारांना कामावर हजर व्हावे लागत आहे. कामगारांना कंपनी प्रशासन व शासकीय यंत्रणा पण मदत करताना दिसत नाही. कंपनी सुरू ठेवण्यासाठी शासनाने कंपनी प्रशासनाला काही अटी व शर्थी घालून दिल्या आहेत, परंतु कंपनी प्रशासन या नियम व अटी बासनात गुंडाळून कामगारांच्या जीवाशी खेळत आहे. कंपनीने कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. कंपनीत अद्ययावत सुरक्षा साधने वापरली पाहिजे. परंतु हे होताना दिसत नाही. कामगारांना दररोज कोरोना लागण होण्याच्या दहशतीखाली जगावे लागते.
कामगार जीवावर उदार होऊन कामावर जात असताना शासकीय यंत्रणा सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहे. एका बाजूला कोरोनाची धास्ती तर दुसऱ्या बाजूला रोजगार जाण्याची भीती अशा दुधारी मनस्थितीत कंपनी कामगार दबावाखाली वावरत आहे. आम्ही करावे तरी काय?असा सवाल हे कामगार करीत आहेत. याबाबत सातकरस्थळमधील गृह सोसायटीत वास्तव्यास असणारे काही कामगार म्हणाले, 'आम्ही राहतो ते प्रतिबंधित क्षेत्र आहे. पण कामावर जावेच लागत आहे. नाही गेलो तर नोकरीतून काढण्याची धमकी मिळत आहे. घराबाहेर पडण्यावरून गावकरी, ग्रामपंचायत व आजूबाजूच्या लोकांशी वादविवाद होत आहे. रोजीरोटीसाठी कामाला जावे लागणार पण आमचा विचार कोणीच करीत नाही.'
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.