Pune News : पेपरफुटीला १० कोटींचा दंड! परीक्षा दिल्यास शुल्कही परत मिळणार

भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी समितीने सोमवारी आपला दुसरा अहवाल राज्य सरकारला केला सादर.
mpsc exam

mpsc exam

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - राज्यातील स्पर्धा आणि भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना किमान १० कोटी रुपयांचा दंड, सात ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि मालमत्ता जप्तीची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करणे, उत्तरतालिकेवरील हरकत योग्य ठरल्यास त्याचे शुल्कही परत देणे, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करणे, अशा महत्त्वपूर्ण शिफारशी उच्चस्तरीय समितीने केल्या आहेत.

Loading content, please wait...