mpsc student agitation
sakal
पुणे - ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’च्या वयोमर्यादेच्या प्रश्नावर सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा संयम अखेर सुटला. शुक्रवारी डेक्कन परिसरात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर ‘विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास विद्यार्थ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले.