

Competitive Exam Guidance
sakal
पुणे : स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सकाळ स्टडी रूम, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि ज्ञानदीप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिवर्सिटी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्कील टेक विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. आर. डी. खराडकर, प्र- कुलगुरू डाॅ. वैभव हेंद्रे, सहायक आयुक्त इनकम टॅक्स विभाग वैभव जाधव, गट विकास अधिकारी सुरज गावडे, ज्ञानदीप अकॅडमी चे वैभव खुपसे आणि नवनाथ वाघ, सकाळ यिन चे विभागीय समन्वयक शंतनू पोंक्षे या कार्यक्रमाला उपस्थित होते.