पुणे : बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरताना शाळेने मागितले 1500 रुपये

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

खडकी बाजार येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे हा प्रकार घडला. बाहेरून परिक्षा सतरा नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा देण्यासाठी कागदोपत्री पुर्तता करण्यासाठी हिना रहीम शेख या शाळेत आली होती.

खडकी बाजार(पुणे) : बारावीची परीक्षेसाठी सतरा नंबर फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीकडून पंधराशे रुपये विना पावती घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका व कार्यालयीन कर्मचारी यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

खडकी बाजार येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे हा प्रकार घडला. बाहेरून परिक्षा सतरा नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा देण्यासाठी कागदोपत्री पुर्तता करण्यासाठी हिना रहीम शेख या शाळेत आली होती. दरम्यान, महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेच्या नियमानुसार फॉर्म भरण्याची अधिकृत फी सहाशे रुपये आहे,  तरीही या विद्यार्थिनीकडून संबंधित शाळेच्या कार्यालयीन कर्मचाऱ्याने  अतिरिक्त पंधराशे रुपयांची सक्ती केली आणि पावती देणार नाही असेही स्पष्ट केले.

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​

हिना शेख यांनी पैसे देण्यासाठी पहिले नकार दिला तेव्हा, ''तुला फॉर्म भरता येणार नाही तू दुसरीकडून फॉर्म भर'' असे सांगितले. तसेच ''शाळेच्या मुख्याध्यापिकांनी मला पंधराशे रुपये घेतल्याशिवाय फॉर्म भरू नका असा आदेश दिल्यामुळे मी तुमच्याकडे पंधराशे रुपयांची मागणी केली आहे." शेवटी नाइलाजास्तव हिना शेख यांनी कर्मचाऱ्याकडे पंधराशे रुपये दिले. इतर विद्यार्थ्यांकडूनही अतिरिक्त पंधराशे रुपये शाळा प्रशासनाने घेतल्यामुळे हिना शेख हिने याविरोधात आवाज उठविण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडे धाव घेतली व सगळी हकीकत सांगितली त्यानंतर बीआरएसपी तर्फे शिवाजीनगर अध्यक्ष नितीन सरोदे यांनी कार्यकर्त्यांसमवेत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह यांची भेट घेऊन सदर बाब सांगितली असता सिंह यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू असे सांगितले. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नितीन सरोदे यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमा सिंह यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापिका व कार्यालयीन कर्मचारी यांची चौकशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.                   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''याप्रकारणाबाबत माझी खडकी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार  सिंह यांच्याशी चर्चा झाली असून 20 जानेवारी रोजी होणाऱ्या बोर्डाचया विशेष सभेमध्ये याबाबत विषय मांडून शाळेच्या मुख्याध्यापिकांशी विचारणा करून जर त्यात जे कोणी दोषी आढळेल त्याविरोधात कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.        
- दुर्योधन भापकर- अध्यक्ष शालेय समिती, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint against the school for charging Rs 1500 for 12th board