पुण्यात किराणा चालकांची 'दुकानदारी' सुरूच; ग्राहक पंचायतीकडे आल्या 'एवढ्या' तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

ग्राहकाला हवी असणारी वस्तु उपलब्ध असतानाही ती न देणे, चढ्या दराने त्याची विक्री करणे आणि बिल न देणे असे प्रकार समोर आले आहेत. व्यापारी अनेक वस्तूंच्या अवास्तव किमती लावत असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबत शुक्रवार पेठेतील काही किराणा मालाच्या व्यापाऱ्यांविरुद्ध पंचायतीकडे तक्रारी आलेल्या आहेत.

पुणे : लॉकडाउन काळात सर्वसामान्य नागरिकांची किराणा दुकान चालकांकडून लूट सुरूच आहे. याबाबतच्या 25 तक्रारी ग्राहक पंचायतीमध्ये दाखल झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

ग्राहकाला हवी असणारी वस्तु उपलब्ध असतानाही ती न देणे, चढ्या दराने त्याची विक्री करणे आणि बिल न देणे असे प्रकार समोर आले आहेत. व्यापारी अनेक वस्तूंच्या अवास्तव किमती लावत असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबत शुक्रवार पेठेतील काही किराणा मालाच्या व्यापाऱ्यांविरुद्ध पंचायतीकडे तक्रारी आलेल्या आहेत. काही जागृत ग्राहकांनी संबंधित दुकानांमध्ये वस्तूंचे दर कशा पद्धतीने आकारले जात आहेत हे सर्वांच्या लक्षात यावे यासाठी काही दुकानांच्या (कच्चा) बिलांचे फोटोही ग्राहक पंचायतीकडे पाठवले आहेत. ते फोटो पाहून ग्राहकांची तक्रार रास्त आहे असे जाणवल्यामुळे पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्डमधील होलसेल वस्तूंच्या किमती विषयी चौकशी करण्यात आली.  

अय्या खरंच, तुळशीबाग सुरू होत आहे...

उत्तम दर्जाची हळकुंड ११० ते १२० रुपये किलो  असताना ती २४० किलो या दराने विकण्यात येत आहे. हिंगचा २०० ग्रॅमचा १ डबा होलसेल भाव १०० रुपये असा आहे. त्यावर एमआरपी २१५ असून विक्री १५० रुपयांना केली जात आहे. याविषयी अधिक माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष विलास लेले यांनी सांगितले की, लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक सुरुच आहे. फसवणूक करणा-या दुकानदारांविषयी किराणा माल संघटनेच्या पदाधिका-यांना विचारणा केली आहे. तसेच पोलिस आणि अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांना देखील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे.

पुणे : कोथरूडवरील विघ्न थोडक्यात टळले; पहाटेपर्यंत चादणी चौकात होते चिंतेचे वातावरण

जीएसटीचे पक्के बिलही दिले जात नाही. तसेच सरकारचा टॅक्स ही चुकवला जात आहे.  यावर योग्य उपाय व्हावा म्हणूनच पंचायतीमार्फत  सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी व जीएसटी कौन्सिल यांना देण्यात येणार आहे. ग्राहकांना पक्के बिल द्यावे व ग्राहकांचे आर्थिक शोषण होणार नाही इतका नफा कमवावा, अशी विनंती व्यापारी वर्गाला पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints against grocery Shopkeepers received to Consumer Panchayat in pune