‘मतदार पडताळणी वेळेत पूर्ण करा’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून मतदार पडताळणी कार्यक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करावा, असा आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिला.

पुणे - पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून मतदार पडताळणी कार्यक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करावा, असा आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिला.

११ नोव्हेंबरपासून मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू आहे. याचा आढावा घेण्यासाठी बलदेव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, मिलिंद शंभरकर, साताऱ्याचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नोंदणी झालेल्या मतदारांची पडताळणी १३ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक आहे. यात मागे असणाऱ्या जिल्ह्यांनी निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन संबंधित विभागाला निर्देश द्यावेत. राजकीय पक्षांच्या बैठकांद्वारे पक्षनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता यांच्या नियुक्तीचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete the voter verification in time