पुणे-पिंपरी चिंचवडमधील मेट्रोसाठी आता डिसेंबरचा मुहूर्त !

पुणे-पिंपरी चिंचवडमधील मेट्रोसाठी आता डिसेंबरचा मुहूर्त !

पुणे : शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पहिल्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहवी लागणार आहे. त्या दरम्यान एकूण सुमारे ११ किलोमीटरच्या मेट्रोचे काम पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मेट्रो धावावी, असा दोन्ही महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. (completion of the first phase metro project in the city and Pimpri Chinchwad in December)

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी दरम्यान मेट्रो मार्गांचे काम सध्या सुरू आहे. त्यात पहिल्या टप्प्यात पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान ६. २ किलोमीटरवर मेट्रो धावणार आहे. तर, वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यान ५. ४ किलोमीटरवर पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार आहे. या दोन्ही टप्प्यांत अऩुक्रमे पिंपरीतील संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी आणि फुगेवाडी तर, वनाज, आनंदनगर आणि गरवारे महाविद्यालय ही स्थानके असतील.

पुणे-पिंपरी चिंचवडमधील मेट्रोसाठी आता डिसेंबरचा मुहूर्त !
पुणे- मुंबईतून परराज्यांतील 5 मार्गांवर शुक्रवारपासून विशेष रेल्वेगाड्या
Pimpri Chinchwad Metro Station
Pimpri Chinchwad Metro Stationसंतोष हांडे

पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर त्यात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यासाठी खांब उभारून त्यावर व्हायडक्ट उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्गांवर वाहतूक नियंत्रक दिवे उभारणे, वीज पुरवठ्यासाठी केबल टाकणे आदींची कामे ४० टक्के पूर्ण झाली आहेत. तर, इलेक्ट्रीकची कामेही सुमारे ४३ टक्के पूर्ण झाली आहेत.

या दोन्ही मार्गांवरील सातही स्थानके एलिव्हेटेड (उंचावर) असतील. त्यामुळे प्रवाशांना चढ- उतार करण्यासाठी १४ एक्सलेटर (सरकते जिने) पुण्यात दाखल झाले आहेत. तसेच मेट्रोच्या कोचचेही बांधकाम वेगात सुरू आहे. मेट्रो प्रवासादरम्यान प्रवाशांना सायकलींसह प्रवास करता येईल. तसेच प्रवासासाठी मेट्रोचे कार्डही निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांना ते कार्ड नियमितपणे रिचार्ज करून वापरता येईल. तिकिट तपासणीसाठी मेट्रोच्या स्थानकांत स्वयंचलित यंत्रणा असेल. त्यायंत्रणेचीही निश्चितीही झाली आहे.

First Metro Rail on track in Pune
First Metro Rail on track in Pune
पुणे-पिंपरी चिंचवडमधील मेट्रोसाठी आता डिसेंबरचा मुहूर्त !
Colorful & Cool : कतरिनाची हटके मॉन्सून फॅशन

स्थानकांच्या कामांनाही वेग

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो मार्गांत पहिल्या टप्प्यातील काम गेल्यावर्षी डिसेंबर आणि यंदाच्या मार्चमध्ये पूर्ण करण्यास पालकमंत्री अजित पवार यांनी बजावले होते. परंतु, कोरोनाच्या लॉकडॉऊनमुळे कामे काही प्रमाणात रखडली होती. परंतु, आता सातही स्थानकांच्या कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड- फुगेवाडी दरम्यानचे मेट्रोचे काम डिसेंबरअखेर तर, पुण्यात पहिल्या टप्प्यातील मेट्रो पुढील वर्षी जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे.

''दोन्ही शहरांतील पहिल्या टप्प्यातील कामाने वेग घेतला आहे. लॉकडॉऊनच्या काळातही काम सुरू होते. आता कामाचा वेग वाढला आहे. डिसेंबरपर्यंत पिंपरीतील जानेवारीपर्यंत पुण्यातील पहिल्या टप्प्याचे काम निश्चितच पूर्ण होईल. या मार्गांवरील स्थानकांची कामेही वेगात सुरू आहेत. ''

- हेमंत सोनवणे (महासंचालक, महामेट्रो)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com