MPSC Student
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - स्पर्धा परीक्षांमधील अनिश्चितता, वाढता आर्थिक ताण आणि शेतीच्या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, याची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यातच पुण्यासारख्या शहरात राहण्याचा, जेवणाचा आणि अभ्यासिकेचा खर्च परवडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून गावी परतावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ परीक्षा वेळेत घेणे पुरेसे नसून, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक आणि सामाजिक आधार देणारे सर्वंकष धोरण आखण्याची गरज आहे, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि मार्गदर्शकांनी व्यक्त केली आहे.