esakal | पुणे : इंजिनिअरची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : इंजिनिअरची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : इंजिनिअरची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
पांडूुरंग सरोदे

पुणे : जर्मनस्थित नामांकित कंपनीमध्ये संगणक अभियंता असलेला तसेच गिर्यारोहक असलेल्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. डेक्कन परिसरात बीएमसीसी रस्ता येथे ही घटना घडली. अक्षयच्या मृत्युचे कारण अजुन समजले नाही, मात्र त्याने मानसिक तणावातून हा प्रकार केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.(Computer engineer and mountaineer Akshay Devdhar commit suicide by strangulation)

अक्षय सुधीर देवधर (वय ३६, रत्नाली अपार्टमेंट, बीएमसीसी रस्ता, डेक्कन) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर देवधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा मुळचा मुंबई येथील आहे, त्याचे आई-वडिल मुंबईला राहतात. तर अक्षय इंग्लैंड येथे शिक्षण घेत होता. तेथेच तो नोकरी करीत होता. मात्र काही महिन्यापूर्वी तो पुण्यात आला होता. डेक्कन येथील बीएमसीसी रस्ता परिसरातील रत्नाली अपार्टमेंटमध्ये त्याच्या आजोबांची सदनिका होती. त्यामध्ये तो एकटा राहात होता. तो घरुनच त्याच्या कंपनीचे काम करीत होता.

हेही वाचा: पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोना निर्बंध जैसे थे

दरम्यान, गुरुवारी अक्षय फोनला प्रतिसाद देत नव्हता, त्यामुळे त्याचे नातेवाईक त्याच्या सदनिकेवर आले तेव्हा, त्यांना सदनिका आतुन बंद असल्याचे निदर्शनास आले. तसेच तो दरवाजाही उघडत नव्हता. त्यामुळे नातेवाइकांनी डेक्कन पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अग्निशामक दलास खबर दिली. अग्निशामक दलाने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अक्षयने गळफास घेतल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यास ससून रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.अक्षयच्या मृत्युचे कारण अजुन समजले नाही, मात्र त्याने मानसिक तणावातुन हा प्रकार केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 8 गाड्यांचा चुराडा तर एकचा मृत्यू

अक्षयने केले नेत्रदान !

अक्षयला गिर्यारोहणाची प्रचंड आवड होती.अनेक ठिकाणी त्याने यशस्वी चढ़ाई केली होती. अक्षयने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली नाही, मात्र त्याच्या डायरीमध्ये "या जीवनाला अर्थ नाही" असे लिहिल्याचे पोलिसांना आढळले आहे. दरम्यान, अक्षयच्या मृत्युनंतर त्याचे नेत्रदान करण्यात आले आहे.

loading image