संगणक अभियंता तरुणीस भररस्त्यात मारहाण; ऍसिड टाकण्याची दिली धमकी

रस्ता ओलांडणाऱ्या संगणक अभियंता तरुणीला धक्का देत तरुणाने भररस्त्यात मारहाण करून विनयभंग केला.
crime
crimeesakal
Summary

रस्ता ओलांडणाऱ्या संगणक अभियंता तरुणीला धक्का देत तरुणाने भररस्त्यात मारहाण करून विनयभंग केला.

पुणे - चहाच्या स्टॉलवर सहकाऱ्यांसह चहा पिऊन रस्ता ओलांडणाऱ्या संगणक अभियंता तरुणीला धक्का देत तरुणाने भररस्त्यात मारहाण करून विनयभंग केला. तसेच तरुणीला तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत चंदननगर पोलिसांनी तरुणाला अटक केली. तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. हि घटना शुक्रवारी (ता.17) सायंकाळी सहा वाजता खराडी परिसरात घडली.

रोहित शरद माने (वय 27, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह दोन साथीदारांविरुद्ध विनयभंग, धमकाविणे, मारहाण केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संगणक अभियंता तरुणीने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हि खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या सहकाऱ्यांसमवेत चहा पिण्यासाठी कंपनीबाहेर आली होती. चहा पिऊन झाल्यानंतर तरुणी सहकाऱ्यांसमवेत रस्ता ओलांडत होती. त्यावेळी माने हा त्याच्या साथीदारांसमवेत दुचाकीवरुन तेथून जात होता. मानेच्या दुचाकीचा तरुणीला धक्का लागला. त्याबाबत तरुणीने त्यास जाब विचारला. तेव्हा, त्याने तरुणीला भररस्त्यातच हात पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणीचा विनयभंग करुन तिला ढकलून दिले. तसेच चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची धमकीही दिली. घडलेल्या या प्रकारानंतर तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दहा मिनीटांमध्येच मानेला अटक केली. तसेच त्याच्यासमवेतच्या दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com