Computer Engineer : परप्रांतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा रिसोर्टच्या बॅकवॉटरमध्ये पाय घसरून पडून मृत्यू

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना काल (ता. ०७) रोजी घडली होती.
Mohit Saraf
Mohit Sarafsakal
Summary

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना काल (ता. ०७) रोजी घडली होती.

वेल्हे, (पुणे) - वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना काल (ता. ०७) रोजी घडली होती. दरम्यान पाण्यात पडलेल्या युवकाचा १४ तासाच्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी नऊच्या दरम्यान मृतदेह मिळून आला असल्याची माहिती पानशेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यानी दिली.

मोहित हेमंत सराफ (वय-३०) राहणार घर नं. ६९, लक्ष्मीगल्ली कुठीर, लक्ष्मीपुरा, वार्ड-सागर, राज्य-मध्यप्रदेश असे युवकाचे नाव असून बाणेर येथील एका खासगी आय. टी. कंपनीच्या मीटिंगसाठी तो पुण्यात आला होता.

याबाबत निखिल किशोर बडगुजर (वय. २४) वर्ष भोसरी प्राधिकरण या अभियंत्याने वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहीती देताना पोलीसांनी सांगितले कि, ३ एप्रिल ते ७ एप्रिल रोजी दुपारी दोन पर्यंत अवलारा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मीटिंग बाणेर, पुणे येथील अमर सदानंद टेक्नॉलॉजी पार्क येथे आयोजित करण्यात आली होती. सदर मीटिंगसाठी कंपनीच्या संपूर्ण भारतातील कामगार उपस्थित होते.

काल सात एप्रिल दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले व मुली यांचा ग्रुप पानशेत परिसरातील धिंडली (ता. वेल्हे) येथील आर्यावत रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता.

दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता सर्व जण रिसोर्टवर पोहचले रिसोर्ट फिरल्यानंतर अनशुल कमल अमेठा, वृषाली रामभाऊ गायधने, हरविंदरजित भुरसिंग सिंग, शबनम नरुद्दीन सिध्दीकी, मानसी संजयकुमार अगरवाल, मोहित हेमंत सराफ हे सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले. धरणाच्या बॅंकवॅाटरच्या पाण्यात गुडगाभर पाण्यात सर्वजण गेले. यावेळी मोहित सराफ याचा पाय घसरुन खोल पाण्यात पडला.

त्यावेळी निखिल किशोर बडगुजर हा देखील यावेळी पाण्यात पडला. परंतु, जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला. यावेळी मोहितला काढण्यासाठी सर्वजणांनी साखळी तयार केली. सर्वांनी मोहीतला पाण्यातुन वर काढण्याचा खुप प्रयत्न करत असताना अनशुल अमेठा हा सर्वात पुढे होता त्याचा देखील पाय घसरु लागल्याने सर्वजण घाबरुन पाण्याच्या बाहेर आले. यावेळी मोहीत सराफ हा खोल पाण्यात बुडाला. कोणालाही पोहता येत नसल्याने त्याचे प्राण वाचवु शकले नाहीत.

झालेला प्रकार स्थानिक ग्रामस्थ, रिसोर्टचे मालक, व पोलीसांना कळताच त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे मदत मागवली असता त्याच्याकडून मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती रवाना करण्यात आली. रात्री अंधार असल्याने कामात अडथळे येत होते तेव्हा आज सकाळी दिवस उजडता पुन्हा कामाला सुरूवात करण्यात आली १४ तासानंतर मोहित सराफ याचा मुत्यूदेह शोधकार्य करते वेळी मिळून आला.

यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, रुशीकेश शिवतरे, तानाजी भोसले, हनुमंत नवले, आबाजी जाधव, राजू प्रधान, निखील, यांनी मोलाचे सहकार्य केले.

वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पानशेत पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार पंकज मोघे, राजाराम होले अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com