Nazare Reservoir
sakal
मोरगाव - पुरंदर तालुक्याचा पूर्वपट्टा व बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी वरदान ठरलेले नाझरे जलाशय पावसाअभावी कोरडे पडू लागले आहे. सध्या हे धरण उपयुक्त पाणीसाठ्याशिवाय केवळ मृत साठ्यावर अवलंबून आहे. याच राखीव पाण्यावर सात प्रमुख पाणीपुरवठा योजना आणि टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरू असून, पावसाने आणखी ओढ दिल्यास या दोन्ही तालुक्यांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.