
पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून खेड शिवापूर ते रावेतदरम्यान सेवा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यानंतरच सुरू होईल. त्या वेळी पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत काही नवे सेवा रस्तेही होतील. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल.